कविता उन्हाळ्याची
आला, आला उन्हाळा आता तब्येत सांभाळा! नका करू दगदग ऊन्हाची भिती बाळगा या ऊन्हाळ्याची! पाणी, ताजी फळे, लिंबु सरबत ठेवील तुम्हाला उन्हाळ्यात सशक्त! सुरक्षित अंतर आणि वापरुनी मास्क रोगांशी करु आपण दोन दोन हात! महामारी आणि ऊन्हाळ्याचा करु सामना प्रभुचरणी माझी असे कामना! मुलमंत्र हा जपण्या या काळा आला,आला उन्हाळा, तब्येत सांभाळा आला,आला उन्हाळा आता तब्येत सांभाळा!