कथेचे नाव- टपाल

 <a target="_blank" href="https://www.amazon.in/gp/bestsellers/music?_encoding=UTF8&linkCode=ib1&tag=sam12306bd-21&linkId=056ef50c6bdf82c63ff0483720670731&ref_=ihub_curatedcontent_2627d4a2-772d-41dd-b4e8-7ab22b9d042d">Best Sellers in Music</a><img src="//ir-in.amazon-adsystem.com/e/ir?t=sam12306bd-21&l=ib1&o=31" width="1" height="1" border="0" alt="" style="border:none !important; margin:0px !important;" />

पोष्टमन……………………

      सकाळच्या पहिल्या डाकेचे टपाल घेऊन पोस्टमन आला, आणि गावात येऊन्प्रत्येक घरात ज्याचे त्याचे टपाल देऊन गेला.माधवराव या पोस्टमनची आतुरतेने वाट पाहत घराच्या उंब-यावर उभे राहायचे, की कधीतरी त्यांच्या मुंबईतल्या मुलाचे पत्र येईल, आणि कधीतरी तो आपली खुशाली कळवेल.

        माधवरावांचा मुलगा मुंबईमध्ये कामानिमित्त गेलेला होता, आणि तेथेच स्थायिक झालेला होता.माधवराव गावातल्या घरी एकटेच राहायचे, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. माधवरावांच्या मुलाने त्यांना आपल्यासोबत मुंबईला येण्याबाबत सांगितले होते, परंतू माधवरावांचे मन त्यांच्या वाडवडिलार्जित घरातच रमत होते, तेथे त्यांच्या जुन्या आठवणी नांदत होत्या.तो अगदीच जुना काळ होता.त्यामुळे टपाल घेऊन येणा-या पोस्टमनला त्या काळी खूप महत्व असायचे.माधवरावांचा मुलगा मुंबईला गेल्यापासून जणू तिथलाच झाला होता, ना त्याचे कोणते पत्र आले होते, आणि ना कोणता संदेश, परंतू माधवरावांनी आशा सोडली नव्हती, की कधीतरी त्यांच्या मुलाचे पत्र येणार आणि त्याची खुशाली कळणार.

              माधवरावांनाही कधीतरी वाटायचे की एवढया दिवसात मुलाचे पत्र नाही तर त्याला मुंबईत जाऊन आपण भेटून यायचे त्याची खुशाली पाहायची.परंतू त्या काळात एवढे पैसे उभे करणे माधवरावांना शक्य नव्हते, आणि त्यावेळी पत्र किंवा तार याशिवाय अन्य पर्याय नसायचा. माधवरावांना आपल्या मुलाचा मुंबईतला पक्का पत्ता माहित नव्हता, आणि मुलानेही कधी त्यांना तसे सांगितले नव्हते, परंतू माधवरावांची इच्छा दांडगी होती, त्यांना एक दिवस मुंबईला जाण्याची संधी चालून आली, काही करुन्मुलगा कुठेही असेल त्याला भेटायचं त्यांनी ठरवलं, पण हाय रे दुर्दैव ज्या गाडीने ते मुंबईला जाणार होते, ती गाडीच नेमकी त्यांना चुकली, आणि पुढे काही अंतरावर त्या गाडीचा अपघात झाल्याची बातमीही त्यांना समजली.मुंबईला जाणारी त्यांच्या गावात त्या वेळी ती एकच बस होती.माधवरावांना आपण अपघातातून बचावलो, ते सुदैव वाटत होते, पण आपल्या मुलाला भेटता आले नाही, आणि नाहक या अपघातात जे जखमी झाले त्यांच्याबददल हळहळ वाटत होती.

              आजही माधवराव रोजच्याप्रमाणे मुलाच्या पत्राची वाट पाहत घराच्या उंब-यावर उभे होते.पोस्टमन रोजच्या प्रमाणे आला आणि पत्र वाटून निघून गेला, माधवरावांचे काही टपाल आले नाही. तेव्हा शेजारच्या छोटयाशा किराणा दुकानदाराचा मालक त्याची टेर उडवत त्याला म्हणाला,”काय माधवराव आज कितवी वेळ?” माधवरावांना त्याच्या बोलण्याचे वाईट वाटले नाही, त्याचा स्वभाव त्यांना माहित होता, ते यावर काहीच बोलता आतमध्ये जाऊन बसले. अशावेळी कधीतरी त्यांचा एक जुना चांगला मित्र त्यांच्या घरी येत असायचा, आणि माधवरावांशी गप्पा मारत असायचा, तासनतास ते गप्पांमध्ये रंगून जायचे.जेव्हा माधवरावांच्या मुलाचा विषय यायचा तेव्हा तो मित्र काहीसा गंभीर व्हायचा आणि म्हणायचा,” हे बघ माधव अरे आता मुले मोठी झाली, आता त्यांना पंख फुटले ती थोडीच तुझ्या माझ्यासाठी राहणार आहेत, ती तर मुक्त आकाशात भरारी घेणार. तेव्हा तु तुझ्या मुलाची काळजी करत राहू नकोस, आपण कसं आनंदी असायला पाहिजे बघ.” अशावेळी माधवराव काहीसे गहन विचारात राहायचे, परंतू मनातून मात्र त्यांना एक प्रकारची उणीव जाणवत असायची.

          एक दिवस ते असेच स्वयंपाकघरामध्ये काहीतरी काम करीत होते. त्यांच्या मनात आपल्या मुलाचाच  विचार चालू होता, खिडकीतून त्यांना पोस्टमन येताना दिसला, परंतू माधवराव आपल्या कामात एवढे मग्न होते, की त्यांनी बाहेर येऊन पाहण्याचे टाळले. शेवटी रोजच्यासारखेच आपण उंब-यावर उभे राहणार आणि खोटी आशा दाखवणार. पोस्टमन आला आणि निघूनही गेला, पण यावेळी मात्र त्याची पोस्टमन………..अशी हाक ऐकू आली नाही.माधवराव आपल्या कामात एवढे मग्न होते की त्यांना पोस्टमनची हाक कशी ऐकू येणार होती, परंतू जवळच्या स्टोव्हने कधी भडका घेतला, आणि स्टोव्हचा स्फोट झाला तेच त्यांना कळले नाही.

            माधवरावांनी बाहेर येऊन पाहिले.पाहतो तर काय, एक पत्रांचा लखोटाच त्यांच्या उंब-यावर ठेवलेला होता. माधवरावांनी आर्श्चयाने तो लखोटा उचलून घेतला आणि आतमध्ये उघडून त्यांनी टपाल वाचायला सुरवात केली, पत्रे वाचता वाचता त्यांच्या डोळयांतून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या, त्यांचे मन उचंबळून आले.मुलाने मुंबईला गेल्यापासूनची पत्रे त्यांना पाठवली होती, त्यावर पोस्टाची तारीख नमुद केलेली होती. माधवरावांनी मागच्या बाजूला उलटून पाहिले, आणि त्यांना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला, कारण ती सर्व पत्रे त्या पोस्टमनच्याच नावावर आली होती, त्यावर त्याचा पत्ता दिलेला होता.मुलाला गावातील माधवरावांच्या पर्यायाने आपल्या घराचा पत्ताच माहित नव्हता, त्यामुळे त्याने ती टपाले पोस्टमनच्या पत्त्यावर पाठवली होती.

       पोस्टमनला आपल्या नावावर ही सर्व पत्रे येत आहेत, याची कल्पना नव्हती, तो बिचारा आपले काम करत असायचा, परंतू एक दिवस सहजच त्याने आपल्याकडील शिल्लक पत्रे पाहिली असता, त्याला आपली चूक समजली होती, आणि त्याने स्वत: येऊन तो पत्रांचा लखोटा माधवरावांच्या घराच्या उंब-यावर आणून ठेवला होता. माधवरावांचे हृदय भरुन्आले, पोस्टमनचे आभार मानावे, म्हणून ते त्याच्या मागे मागे पळत गेले, परंतू पोस्टमन भरभ्र गावाबाहेर जात होता.माधवरावांनी त्याला हाक मारायला सुरवात केली, परंतू त्याने मागे वळून पाहिले नाही.अगदी माधवराव त्याच्या मागे जवळ आले असतानाही त्याला हाक ऐकू आली नाही, तो तसाच थांबता चालत राहिला.माधवराव तिकडे पाहत होते, माधवरावांना त्याची अस्पष्टशी सावली दूरवर गेलेली दिसत होती, उंच आकाशात एक घार उगाचच घिरटया घालत होती.वातावरण अगदी निशब्द बनले होते, परंतू दूरवरच्या त्यांच्या घराबाहेर मात्र गिधाडांचा थवा येऊन विसावला होता, आणि कुत्रयाचे अपशकुनी रडणे उगाचच त्या वातावरणात भर टाकत होते.😔 

------------------------------------समाप्त--------------------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

कविता उन्हाळ्याची

अर्थशास्त्र विकासाचे शास्त्र